गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

हा शब्द अनु + वाक्  या शब्दांपासून तयार झालेला आहे. जर शब्दशः अर्थाचा विचार केला तर एखादी गोष्ट पुन्हा सांगणे असा अनुवाद या शब्दाचा अर्थ होतो. एखाद्या भाषेतील ग्रंथ अथवा साहित्य हे त्याची विषयवस्तू किंवा रचना कायम ठेवून दुसऱ्या भाषेत आणणे याला अनुवाद असे म्हणतात. अनुवाद हे भाषांतर नव्हे कारण अनुवादामध्ये रूपांतरीत करायच्या ग्रंथाचा विषय किंवा रचना कायम ठेवलेली असते परंतु शब्दांचे साधर्म्य कायम ठेवणे आवश्यक नसते. भाषांतरामध्ये मात्र शब्द आणि शब्द हा जसाच्या तसा रूपांतरित करणे हे अपेक्षित आहे. सध्या अनुवाद आणि भाषांतर हे शब्द बरेचदा एकमेकांच्या जागी वापरले जातात पण तसे करणे हे अर्थाच्या दृष्टीने योग्य नाही.

जसे: पु. ल. देशपांडे यांनी अर्नेस्ट हेमिंगवेच्या “ओल्ड मॅन अँड द सी” या कादंबरीचा अनुवाद “एका कोळीयाने” या नावाने केलेला आहे तर मंगला निगुडकरांनी “चीपर बाय द डझन” या पुस्तकाचे भाषांतर केले आहे.