गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

अठराविश्वे हा शब्द नेहमीच दारिद्र्याचे विशेषण म्हणून वापरला जातो. अठराविश्वे दारिद्र्य म्हणजे अति प्रमाणात असणारे आणि सततचे दारिद्र्य. जसे: सुदामा अठराविश्वे दरिद्री तर कृष्ण साक्षात नवकोट नारायण!

पण या अठराविश्वांचा आणि दारिद्र्याचा काय संबंध?

मूळ शब्द अठराविश्वे असा नसून अठराविसे असा आहे. १८ गुणिले २० म्हणजे ३६० दिवस दरिद्री तो अठराविसे दरिद्री! मराठी वर्ष हे ३६० दिवसांचे असते. म्हणूनच सदैव दरिद्री असा अर्थ या शब्दातून निघतो.

मराठी वर्ष ३६० दिवसांचे म्हणजेच चांद्र वर्ष असल्याने दर ४-५ वर्षांनी अधिक मास घेऊन ते सौरवर्षाशी (जे ३६५ दिवसांचे असते) सुसंगत करावे लागते. मुस्लिम कालगणनेत अधिक मासाची संकल्पना नसल्यामुळे एकाच वर्षात लागोपाठ  सारखेच महिने येणे अशी अनेक अनवस्था प्रसंग उद्भवतात. मात्र अठराविसेच का ? बारातीसे का नाही? या प्रश्नांची निश्चित उत्तरे सापडत नाहीत.