गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

“उगीच फालतूपणा करू नकोस “ पासून “आजची माझी चक्कर फालतू गेली” इथपर्यंत अनेक पद्धतीने हा शब्द मराठीत वापरला जातो. मराठीत अगदी सर्वांच्या वापरात असलेला आणि दृढमूल झालेला हा शब्द मूळ मराठी नाही!

पोर्तुगीज भाषेतील falto (फालतो) या निरूपयोगी अथवा कमजोर अशा अर्थाच्या शब्दावरून हा शब्द मराठीत आलेला आहे. गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते त्या काळापासून हा शब्द हळूहळू मराठीत रुळत गेला आणि आज सर्वमान्य झालेला आहे. अर्थ तोच राहिला, फक्त शब्दाचे रूप थोडेसे बदलले आहे एवढेच काय ते!

इतर भाषांच्या आणि संस्कृतींच्या प्रभावामुळे मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आले आणि मराठी भाषा समृद्ध होत गेली या प्रक्रियेचे हा शब्द एक उदाहरण आहे