गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

हा एक फारसीतून आलेला शब्द आहे. जामा म्हणजे कलाकुसर असलेला बंद गळ्याचा अंगरखा. तर निमा म्हणजे तंग आणि पायघोळ पायजमा. म्हणूनच जामानिमा करणे म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी योग्य असा उत्तम पोशाख करणे आणि विशेषेकरून कुर्ता पायजमा असा पोशाख करणे. कालांतराने ह्या शब्दाचा अर्थ व्यवस्थित तयार होणे वा तयारी करणे असा झालेला आहे.

जसे: मी जामानिमा करून कार्यक्रमाला जायला निघालो.

यातला जामा हा शब्द हिंदीमध्ये “ कोई चीज को अमली जामा पहनाना “ म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्षात आणणे या अर्थाने वापरला जाताना दिसून येतो.