गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

कर्णधार हा शब्द एखाद्या संघाचा प्रमुख किंवा नेता या अर्थाने वापरण्याची पद्धत आहे. जसे: विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा होता. मात्र हा शब्द नौकानयन या प्रांतातून आलेला आहे. कर्ण म्हणजे सुकाणू. आणि जहाजाचे सुकाणू ज्याच्या हातात असते तो कप्तान म्हणजे कर्णधार. म्हणजेच जहाजाच्या कप्तानाला कर्णधार असे म्हणण्यात येत असे. त्यावरून आता कुठल्याही संघाचा नेता या अर्थाने हा शब्द मराठीत रूढ झालेला आहे. पण अगदीच अचूक विचार करायचा झाल्यास कर्णधार या शब्दाचा अर्थ जहाजाचा कप्तान असा आहे.

इंग्रजी भाषेत याचा प्रतिशब्द स्किपर (Skipper) हा आहे आणि हा शब्द सुद्धा डच भाषेतील Schipper या शब्दावरून आलेला आहे.