गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

उटपटांग हा शब्द हिंदी भाषिक लोकांच्या जास्त वापरात आहे. उटपटांगचा अर्थ असंबद्ध आणि त्यामुळे निरर्थक बोलणे असा आहे. जसे: बहुतांश राजकारणी काहीतरी उटपटांग बोलतात.

याचा मूळ शब्द उत्पातांग असा आहे. उत्पातांग हा शब्द उत्पात + अंग असा संधी होऊन बनलेला आहे. उत्पात ( उत् = वर जाणे + पात= खाली जाणे) म्हणजे खाली वर होणे. ज्याला आपल्या अंगाचा कुठला भाग खाली किंवा वर होत आहे याची सुद्धा शुद्ध नाही अशा कुठल्यातरी नशेमध्ये धुंद असणाऱ्या व्यक्तीला उत्पातांग हे विशेषण वापरले जाते. सहाजिकच अशा व्यक्तीचे बोलणे असंबद्ध आणि त्यामुळे निरर्थक असणारच. हा उत्पातांग शब्द हळूहळू बदलत उटपटांग असा रूपांतरीत झालेला आहे.

यावरून उटपटांग म्हणजे असंबद्ध आणि निरर्थक बोलणे असा अर्थ सिद्ध होतो.