१. जुळवा जुळव या खेळाचा वेब पेज उघडल्यावर आपल्याला एक 16 कप्पांचा चौकोन दिसेल.

२. त्या 16 ही कप्प्यांमध्ये 16 शब्द लिहिलेले आहेत. यातील चार - चार शब्द हे कुठल्या ना कुठल्या संबंधाने जोडलेले आहेत. म्हणजेच त्यात काहीतरी समान सूत्र आहे.

३. हे चार शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. म्हणजे चार शब्दांच्या एकूण चार रांगा आपल्याला ओळखायच्या आहेत. यासाठी सर्वप्रथम जे शब्द आपल्याला समान आहेत असे वाटते ते सिलेक्ट करावेत आणि त्यानंतर सबमिट हे बटन दाबावे जर आपली निवड योग्य असेल तर ते शब्द त्यांच्यामधल्या सूत्रांसहित आपल्याला चौकोनामध्ये वर रंगीत पट्ट्यामध्ये दाखवले जातील.

४. जर आपण केलेली निवड चुकलेली असेल तर तसा मेसेज आपल्याला स्क्रीनवर दिसेल व आपला एक चान्स कमी होईल एकूण चार संधींमध्ये (चान्सेस) मध्ये हे कोडे आपल्याला सोडवायचे आहे.

५. शब्द निवडत असताना त्यांचे अनेक अर्थ तसेच काही एका वस्तूशी किंवा जातीशी असणारा संबंध अशा वेगवेगळ्या अनेक बाबींचा विचार आपल्याला करावा लागेल. उदा.- लाल, पिवळा, हिरवा, जांभळा ही चार रंगांची नावे आहेत. त्यामुळे हे चार शब्द सिलेक्ट केल्यास रंगांची नावे असा मेसेज येऊन हे चार शब्द चौकोनाच्या वरती एका रांगेत दिसतील.

तारीख लिंक
२२ ऑगस्ट २०२४ https://connectionsplus.io/game/me7AQs
२० ऑगस्ट २०२४ https://connectionsplus.io/game/Wo1WBB
१९ ऑगस्ट २०२४ https://connectionsplus.io/game/2JGJdf
१६ ऑगस्ट २०२४ https://connectionsplus.io/game/ggDDHj
१५ ऑगस्ट २०२४ https://connectionsplus.io/game/AsheEv
१३ ऑगस्ट २०२४ https://connectionsplus.io/game/D0ksss
१२ ऑगस्ट २०२४ https://connectionsplus.io/game/CKWkHA