2024
आजचा शब्द: जिलबी
गरमागरम केशरी जिलबीच्या नावाने व कल्पनेने ज्याला ती खावीशी वाटणार नाही असा माणूस विरळाच.
आजचा शब्द: कोजागिरी
शरद ऋतूतल्या आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते.
युगन युगन
नुकत्याच उद्भवलेल्या पाठीच्या दुखण्याचा आस्वाद घेत मी पलंगावर झोपलोय. वेदनांना पण त्यांची एक लय असते हे आता छानपैकी समजतंय, खिडकीतून आकाशात झालेली ढगांची दाटी दिसतेय. खरं तर खूप दिवसांत पाऊस पडलेला नाही. वातावरण कुंद होतं, ढग दाटून येतात, जोराचा पाऊस येईलसा वाटतो पण तसं होत काहीच नाही. फक्त ऊकाडा आणि तगमग वाढवून ढग निघून जातात.
आजचा शब्द: हरताळ
हा शब्द सध्या सर्व नेते मंडळींचा आवडता आहे. “घटनेच्या मूळ तत्वांना हरताळ फासला!” पासून तर “लोकशाहीला हरताळ फासला!” इथपर्यंत घोषणा सुरू असतात. हे हरताळ नक्की काय प्रकरण आहे?
आजचा शब्द: ऋणानुबंध
हा शब्द “ऋण + अनुबंध” असा बनलेला आहे. या शब्दाचा विशेष अर्थ बघण्याआधी “अनुबंध” आणि “संबंध” या दोन शब्दांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
आजचा शब्द: मुहूर्तमेढ
मुहूर्तमेढ म्हणजे कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना काही विशिष्ट धार्मिक विधी करून रोवलेला एक खांब.
आजचा शब्द: काथ्याकूट
“योजनांवर काथ्याकूट फार झाला, आता कृतीची गरज!” असे मथळे आपण वृत्तपत्रांमध्ये नेहमीच वाचत असतो. या मथळ्यांतील हे काथ्याकूट काय प्रकरण आहे?
हिरना
चैत्रातल्या पंचमीच्या दुपारची वेळ. मी काही कामाने प्रवास करतोय. काही दिवसांआधी झालेल्या पावसाने हवेतील धूळ पूर्ण खाली बसली असेल म्हणून की काय, पण अगदी स्वच्छ प्रकाशाने सर्व आसमंत न्हाहून निघालेला आहे.
आजचा शब्द: ओतप्रोत
या शब्दाशी निगडित एक छान गोष्ट मला आठवते. प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजसुधारक
उड जायेगा…
पौष पौर्णिमेच्या आसपासचा दिवस. वेळ सकाळी पावणे सहाची. मी नेहमीप्रमाणे वनोद्यानात फिरायला आलोय.
आजचा शब्द: अस्खलित
अ + स्खलित असा हा शब्द बनलेला आहे. स्खलित हे विशेषण स्खलन या शब्दावरून तयार झालेले आहे. स्खलन म्हणजे पडणे.
आजचा शब्द: मथितार्थ
संस्कृतीचा भाषेवर आणि भाषेचा संस्कृतीवर परिणाम सतत होत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये दूध,दही, लोणी व तूप यांना विशेष महत्त्व आहे हे आपल्याला माहीतच आहे. याच गोष्टींमधून आजचा आपला शब्द आलेला आहे.
आजचा शब्द: अठराविश्वे
अठराविश्वे हा शब्द नेहमीच दारिद्र्याचे विशेषण म्हणून वापरला जातो. अठराविश्वे दारिद्र्य म्हणजे अति प्रमाणात असणारे आणि सततचे दारिद्र्य. जसे: सुदामा अठराविश्वे दरिद्री तर कृष्ण साक्षात नवकोट नारायण!
आजचा शब्द: उटपटांग
उटपटांग हा शब्द हिंदी भाषिक लोकांच्या जास्त वापरात आहे. उटपटांगचा अर्थ असंबद्ध आणि त्यामुळे निरर्थक बोलणे असा आहे. जसे: बहुतांश राजकारणी काहीतरी उटपटांग बोलतात.
आजचा शब्द: हैदोस
माकडांनी बागेत नुसता हैदोस घातलाय… ह्या पद्धतीने आपण हैदोस हा शब्द बरेचदा वापरतो. शब्दार्थ आहे अनियंत्रित वागणे.
आजचा शब्द: जामानिमा
हा एक फारसीतून आलेला शब्द आहे. जामा म्हणजे कलाकुसर असलेला बंद गळ्याचा अंगरखा.
आजचा शब्द: उचलबांगडी
“एखाद्या व्यक्तीची एखाद्या पदावरून उचलबांगडी!” असे मथळे आपण रोजच वाचत असतो. एखाद्याला एखाद्या जागेवरून जबरदस्तीने उचलून बाजू करणे अशा अर्थाने हा शब्द सहसा वापरला जातो.
आजचा शब्द: सुतराम
सुतराम हा शब्द दोन पद्धतीने वापरण्यात येतो. जसे: १. भारत पाकिस्तानचे संबंध सुधारण्याची सुतराम शक्यता नाही. आणि २. आमचा आणि त्यांचा सुतराम संबंध नाही. म्हणजे एका ठिकाणी तो शक्यता नाकारतो तर दुसऱ्या ठिकाणी संबंध नाकारतो.
आजचा शब्द: अनुवाद
हा शब्द अनु + वाक् या शब्दांपासून तयार झालेला आहे.
आजचा शब्द: कर्णधार
कर्णधार हा शब्द एखाद्या संघाचा प्रमुख किंवा नेता या अर्थाने वापरण्याची पद्धत आहे. जसे: विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा होता.
आजचा शब्द: किमया
किमया या शब्दाचा मूळ अर्थ हिणकस धातूंचे सोन्यामध्ये रूपांतर करण्याची जादुई विद्या हा आहे. त्यामुळे वाच्यार्थाने अशक्यप्राय असणारी गोष्ट करून दाखवण्याची कामगिरी करून दाखवणे या अर्थाने किमया हा शब्द मराठीत वापरला जातो. जसे: रंकाचा राव करण्याची किमया एक सरकारच करू जाणे. तसेच किमया या शब्दाचा एक अर्थ जादू असाही आहे.
आजचा शब्द: फालतू
“उगीच फालतूपणा करू नकोस “ पासून “आजची माझी चक्कर फालतू गेली” इथपर्यंत अनेक पद्धतीने हा शब्द मराठीत वापरला जातो. मराठीत अगदी सर्वांच्या वापरात असलेला आणि दृढमूल झालेला हा शब्द मूळ मराठी नाही!
आजचा शब्द: दिग्गज
दिक् आणि गज या दोन शब्दांनी आजचा शब्द बनलेला आहे. दिक् म्हणजे दिशा आणि गज म्हणजे हत्ती. पण या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे? पुराणकथांमध्ये अशी मान्यता आहे की आठही दिशा म्हणजे चार दिशा आणि चार उपदिशा या आठ हत्तींनी तोलून धरलेल्या आहेत. जसे पूर्व दिशा ही ऐरावत नावाच्या हत्तीने तर पश्चिम दिशा ही अंजन नावाच्या हत्तीने तोलून धरलेली आहे. दक्षिण दिशा वामन नावाच्या हत्तीवर तर उत्तर दिशा सार्वभौम नावाच्या हत्तीवर विसावलेली आहे. संपूर्ण आकाश तोलून धरणारे हे हत्ती निश्चितच अत्यंत बलवान असतीलच हे अगदी स्पष्ट आहे.
त्यामुळेच त्यामुळेच एखाद्या क्षेत्रातील अतिशय कुशल आणि बलवान व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीने त्या क्षेत्रासाठी आधारभूत ठरणारे काम केले असेल अशा व्यक्तीला दिग्गज म्हणून संबोधले जाते. जसे: शास्त्रीय संगीताच्या प्रांतात कुमारजी मोठे दिग्गज होऊन गेले.
ओनामा
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं | | १ | |
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका | | २ | |
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्दचि गौरव पूजा करु | | ३ | |
शब्दांचे महात्म्य सांगणारा तुकोबांचा हा प्रसिध्द अभंग. शब्द आपण रोज उच्चारतो पण त्यांच्या अर्थाकडे हवे तेवढे बारीक लक्ष देतोच असे नाही. ह्या शब्दांचा आणि त्यामागे दडलेल्या अर्थांचा शोध घेण्याचा हा माझा स्वांतसुखाय केलेला प्रयत्न….